वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे शिरसगाव येथे शिवसेना आमदार रमेश पाटील  बोरनारे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झालेल्या 25 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी ह.भ.प.हरिश्रणगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले.

मारूती मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (10 लक्ष रुपये) कामांचे भूमिपूजन,शिरसगाव येथील नाथ वस्तीजवळ रस्त्यांवर नळकांडी पुल (7 लक्ष रुपये) बांधकामांचे भूमिपूजन शिरसगाव-शरिफपुरवाडी  शिव रस्ता मजबूतीकरण 3 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, शिरसगाव-कान्हे वस्ती रस्ता मजबूतीकरण 5 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण अशा एकुण 25 लक्ष रुपये मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे ह.भ.प. हरीशरणगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रमेश पाटील बोरनारे हे होते. ह.भ.प. स्व. गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी भेट देऊन ह.भ.प. हरीशरणगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर शिंदलंबे, तालुकाप्रमुख सुभाष पाटील कानडे, माजी तालुका प्रमुख अंकुश पाटील सुंब, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, सभापती सुनिल केरे, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.