देशात 2लाख 64हजार 202 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये घट

लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 155 कोटी 39 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

नवी दिल्ली/मुंबई ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक  (73,03,669) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 155 कोटी 39 लाखांचा (1,55,39,81,819)टप्पा ओलांडला आहे.देशभरात 1,65,59,387 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,09,345 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,48,24,706 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.20% झाला आहे.गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,87,457 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 90 लाखांहून अधिक (69,90,99,084) चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 14.78%.इतका आहे.

लसीच्या 157.50 कोटींपेक्षा अधिक मात्रांचा केला पुरवठा

केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या 157 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त (1,57,50,62,435) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य पध्दतीने) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.15 कोटी 17 लाखांपेक्षा जास्त न वापरलेल्या (15,17,25,871) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.

मुंबईनंतर राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये घट

मुंबई : मुंबईनंतर राज्यातही गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा आकड्यातही घट झाली आहे. महाराष्ट्रात आज (14 जानेवारी) एकूण 44 हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडाही जवळपास दुप्पटीने कमी झाला आहे.

राज्यात आज (14 जानेवारी) एकूण 43 हजार 211 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.28 % इतका झाला आहे. तर मृतांचा आकडाही 20 च्या खाली आहे.

राज्यात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.98 टक्के इतका आहे. राज्यात काल गुरुवारी (13 जानेवारी) 46 हजार 406 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर 36 जणांचा मृत्यू झाला होता.