औरंगाबाद जिल्ह्यात 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,नांदेड जिल्ह्यात 553 व्यक्ती कोरोना बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 46 हजार 734 कोरोनामुक्त, दोन हजार 713 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 121 जणांना (मनपा 104, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 520 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 53 हजार 109 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण दोन हजार 713 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (401) सातारा परिसर 1, बीड बायपास परिसर 1, घाटी परिसर 1, चिकलठाणा 2, जिल्हा सामान्य रुग्णालय 1, मयूर पार्क 1, सिडको परिसर 1, हर्सुल सावंगी 1, म्हाडा कॉलनी 1, हर्सुल 2, सदाफ कॉलनी कटकट गेट 1, कांचनवाडी 1, देवा नगर 1, दशमेश नगर 1, छावणी परिसर 1, नक्षत्रवाडी 1, समता नगर चौक 1, एमआयडीसी परिसर 1, बन्सीलाल नगर 1, जया नगर 1, उस्मानपुरा 1, वेदांत नगर 1, रोकडीया हनुमान कॉलनी 2, बन्सीलाल नगर 1, इटखेडा 1, जालान नगर 1, शहानुरवाडी 1, पेठे नगर 1, रेल्वे स्टेशन 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 1, शांतीपुरा 1, सावित्री नगर 1, यशोधारा कॉलनी 2, दिल्ली गेट 1, सिल्क मिल्क कॉलनी 1, कौस पार्क सुपारी हनुमान रोड 1, बेगमपुरा 2, पडेगाव 2, गणेशपुरा 1, देवा नगरी 1, ज्यूबली पार्क 1, प्रोझान मॉल परिसर 1, मेहर नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, राहत कॉलनी 1, अजब नगर 1, आकाशवाणी परिसर 1, इंदिरा नगर बायजीपुरा 1, हनुमान नगर 1, शिवाजी नगर 1, एपीआय कॉर्नर 1, अपना नगर 1, एस.टी.कॉलनी 1, कामगार चौक 1, अन्य 341

ग्रामीण (119) औरंगाबाद 52 , फुलंब्री 02 , गंगापूर 19 , कन्नड 11 , खुलताबाद 01, सिल्लोड 02 , वैजापूर 17, पैठण 15

मृत्यू (01) खासगी (01)

1.75 स्त्री, पन्नालाल नगर, औरंगाबाद

नांदेड जिल्ह्यात 553 व्यक्ती कोरोना बाधित,128 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 658 अहवालापैकी 553 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 475 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 226 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 861 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 7, भोकर 5, देगलूर 1, धर्माबाद 3, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 19, किनवट 25, लोहा 12, माहूर 2, मुदखेड 1, मुखेड 16, नायगांव 4, उमरी 2, अमरावती 7, औरंगाबाद 1, पुणे 3, हिंगोली 9, परभणी 20, नागपूर 1, वर्धा 1, वाशिम 3, यवतमाळ 1, कोल्हापूर 1, निजामाबाद 2, पंजाब 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, नांदेड ग्रामीण 4, भोकर 2, बिलोली 7, देगलूर 3, धर्माबाद 7, कंधार 33, किनवट 10, लोहा 1, माहूर 2, मुदखेड 2, मुखेड 9, नायगाव 6 असे एकूण 553 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 1 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 389, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 432, खाजगी रुग्णालय 18 अशा एकुण 1 हजार 861 व्यक्ती उपचार घेत आहेत.