वैजापूर येथे शासकीय मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रात मका उत्पादक शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत आर्थिक लूटमार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मका खरेदी प्रक्रिया दरम्यान उघडकीस आला आहे.

महसूल कर्मचारी व खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक यांच्या संयुक्त देखरेखीखाली मंगळवार पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.या सरकारी खरेदी केंद्रात शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या मकाचे वजन काटयावर प्रतिक्विंटल मागे चार किलो अधिक प्रमाणात मका केंद्रप्रमुखाकडून आकारला जात असल्याचा गैरप्रकार होत आहे तसेच प्रतिक्विंटल वीस रुपये दराने हमालीचा रोख खर्च शेतक-यांच्या माथी मारण्याचा असा दुहेरी आर्थिक लुटीचा कारभार या शासकीय केंद्रावर सुरु झाला आहे.

सरकारी खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडील मका वजन मोजमाप करताना सरकारी यंत्रणेतील कर्मचारी कोणाच्या आदेशानुसार चार किलो अधिकची मका घेण्याचे धाडस करीत असल्याचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे ? शेतक-यांच्या डोळयासमोर प्रतिक्विंटल मागे चार किलो अधिक मकाची मोजमाप करुन त्यांच्या बिल पट्टीत एक क्विंटलची नोंद करण्याच्या प्रकारावर शेतकऱ्यांनी विरोध केला तर केंद्रात त्यांची मका खरेदी केली जाणार नाही.या धास्तीमुळे प्रति क्विंटल मागे चार किलो वाढीव मका आकारणीला त्याच्या कडून कोणताही  विरोध करण्याची मानसिकतेत नसल्याचे दिसून आले.सरकारी किमान आधारभूत केंद्रावर हमी भावाने मका विक्रीसाठी तालुक्यातील ४७० मका उत्पादक शेतक-यांनी आँनलाईन नोंदणी केली होती.

केंद्रप्रमुखाकडून शेतक-यांना प्राधान्य क्रमानुसार मका खरेदी केंद्रावर विक्रीला आणण्याचे नियोजन केले आहे.या केंद्रात प्रतिक्विंटल १ हजार ८७० दराने खरेदी करण्यात येणारी वाळलेली चांगल्या गुणवत्तेची  मकाची आद्रता १४ पाहिजे असा खरेदी केंद्राचा नियम आहे.या केंद्रात खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक अनिल चव्हाण, तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अनिल लांडगे यांच्या नियंत्रणाखाली येत्या ३१ जानेवारी पर्यत वैजापूर तालुक्यात खरीप हंगामातील एकूण २५ हजार क्विंटल मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.त्यानुसार अवघ्या २० दिवसात हमी भावाने मका खरेदी प्रक्रिया येथे सुरु करण्यात आली आहे.

आ.रमेश बोरनारे यांच्या हस्ते मका खरेदी शुंभारभात इंदूबाई उत्तमराव चव्हाण यांच्याकडील ७९ क्विंटलची याठिकाणी खरेदी झाली दुसऱ्या दिवशी या केंद्रावर  भेट देऊन पाहणी केली.त्या दरम्यान पाराळा येथील शेतकरी संदीप संजय चव्हाण शेतकरी खरज क्विंटल-४० किंव्टल, पाराळा येथील शेतकरी रघुनाथ नंदकिशोर देव्हारे ,पाराळा क्विंटल-४०,अनिता नंदकिशोर देव्हारे शेतकरी ,पाराळा क्विंटल-४० या शेतक-यांच्या मकाची आद्रता तपासणी यंत्रात नियमानुसार माऊचर १४ आत असताना केंद्र प्रमुखांनी प्रति किंव्टल चार किलो अधिक मका घेऊन बिल पट्टीत मात्र किंव्टलची नोंद घेतल्याचा प्रकारावर विचारपूस सुरु केल्यावर केंद्र प्रमुखाची बोबडी उडाली.कमी आद्रता असतानाही मोजमापात वाढीव मका कशासाठी घेतली जाते.चार किलो अधिक आकारणी कोणाच्या आदेशानुसार केली जाते असे प्रश्न विचारल्यावर केंद्रप्रमुखानी आमच्या वरिष्ठांशी बोला असे सांगितले.दरम्यान पहिल्या दिवशी झालेल्या खरेदीतील वजन माप करा असे केंद्रप्रमुखाकडे मागणी केली असता त्यांचे माईश्चर १५ पेक्षा जास्त होते असे सांगून शुंभारभाला येथे गैरप्रकार झाल्याची कबुली केंद्र प्रमुखांनी दिली.