नर्सवर अत्‍याचार करणाऱ्या डॉक्टरची रवानगी हर्सूल जेलमध्ये

औरंगाबाद,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या  नर्सवर अत्‍याचार करणाऱ्या  डॉक्टरची  न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर   यांनी शुक्रवारी दिले. डॉ. प्रसाद संजय देशमुख (२४) असे आरोपीचे नाव आहे.

शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात आरोपी आणि फिर्यादी काम करत होते. ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने अनेकदा पीडितेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. डॉक्टर आणि त्याच्या मावस भावाने देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.   त्‍यानंतर डॉक्‍टरने तिचा गर्भपात केला.या  प्रकरणात मुकूंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.