केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-  केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार, दि.15 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 05.15 वा. दिल्ली येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. 07.15 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 08.00 वा. नुतन कॉलनी, औरंगाबाद निवासस्थान येथे आगमन व राखीव. 09.30 वा. चौका येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : चौका, ता.जि.औरंगाबाद) दुपारी 02.00 वा. संपर्क कार्यालय येथे राखीव. (स्थळ : क्रांती चौक औरंगाबाद) सायंकाळी 06.00 वा.हॉटेल अजंता ॲम्बेसेडर येथे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ : हॉटेल अजंता ॲम्बेसेडर, जालना रोड, औरंगाबाद). रात्री 08.00 वा. नुतन कॉलनी निवासस्थान, औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम. 
रविवार, दि.16 जानेवारी, 2022 सकाळी 09.30 वा. माधव बाग हॉस्पीटलचे उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ : साई हॉस्पीटल समोर, क्रांतीचौक पोलीस स्टेशन रोड, औरंगाबाद) 10.30 वा. आडगांव बु. ता.जि.औरंगाबाद येथे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. 11.30 वा. ईस्कॉन मंदिरास भेट (स्थळ : काळे बंधु ढाब्याच्या पाठीमागे, वरुड काझी ता.जि.औरंगाबाद) दुपारी 03.00 वा. दैनिक मराठवाडा केसरी वृत्तपत्राचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : म.न.पा. आरोग्य केंद्राजवळ, शिवाजी नगर औरंगाबाद). सायंकाळी 05.00 वा. महर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : हॉटेल वर्षा ईन, सिडको औरंगाबाद) सायंकाळी 07.30 वा. औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. रात्री 08.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण.