औरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन

भाजीपाला मार्केट, भाजी मंडई, पेट्रोलपंप, किराना दुकाने बंद

सर्व आस्थापना, उद्योग, पेट्रोलपंप बंद

लॉकडाऊन हा निर्णय नाईलाजास्तव-पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद

जिवनावश्यक वस्तूंचा साठा करु नये

औरंगाबाद :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. हा लॉकडाऊन १० ते १८ जुलै दरम्यान असणार आहे.  जिल्हा प्रशासन याला जनता कर्फ्यू असे म्हणत आहे. या काळात उद्दोग व व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे . 

१८ जुलैपर्यंत असलेल्या या संचारबंदीदरम्यान वैद्यकीय सेवा व दूध वगळता शहर परिसरातील सर्व आस्थापना, उद्योग, पेट्रोलपंप भाजी मार्केट, किराना दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (७ जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योग तसेच व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की,करोना प्रसार थांबवा यासाठी संचारबंदी व्हावी अशी जनतेचीही भावना असून हा प्रशासनाचा नाही तर जनतेचा कर्फ्यू आहे, या कालावधीमध्ये शहरातील सर्व आस्थापना, उद्योग, फळ, भाजीपाला मार्केट, किराना मार्केट, बंद ठेवण्याचा प्रयत्न राहील, पेट्रोलपंपाला विशिष्ट कालावधीत सुरु ठेवण्याची परवानगी राहील, जनतेची काही गैरसोय होऊ नये म्हणून या संदर्भात महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त निर्देश देतील असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published.