शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद मोहिमेचे आयोजन

औरंगाबाद,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्या वतीने १५ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत तालुक्यात गाव पातळीवर व शहरात वार्ड स्तरावर संघटनात्मक बांधणी त्याचप्रमाणे विकासात्मक दृष्टीकोनातून विविध विकास कामे या विषयी चर्चा व माहिती तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येणार असल्याचे या शिवसंवाद मोहिमेचे आयोजक, शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

Displaying 20220113_185028-BlendCollage.jpg


या शिवसंवाद मोहिमेच्या अंतर्गत दिनांक १५ जानेवारी रोजी गंगापूर तालुका, दिनांक १६ जानेवारी रोजी गंगापूर-वैजापूर तालुका, दिनांक १७ जानेवारी रोजी गंगापूर – वैजापूर तालुका, दिनांक २१ जानेवारी रोजी औरंगाबाद पश्चिम शहर, दिनांक २३ जानेवारी रोजी कन्नड – सोयगाव तालुका, दिनांक २५ जानेवारी रोजी कन्नड – रत्नपूर तालुका, दिनांक २८ जानेवारी रोजी औरंगाबाद मध्य, शहर दिनांक ३० जानेवारी रोजी औरंगाबाद पूर्व शहर या ठिकाणी बैठका होणार आहे.

या मोहिमेत सर्व शिवसैनिक – महिला आघाडी – युवासेना- इतर अंगीकृत संघटनांनी, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी शासनाने दिलेल्या सर्व covid-19 नियमावलीचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजु राठोड, अवचित वळवळे, लक्ष्मणभाऊ सांगळे, अविनाश पाटील, संतोष काळवणे, कृष्णा डोणगांवकर, राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, बप्पा दळवी, महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप,  समन्वयक कला ओझा, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, केतन काजे, राजु वरकड, सचिन वाणी, सुभाष कानडे, आबा काळे, हनुमंत भोंडवे, तालुका संघटक डॉ. अण्णा शिंदे, गणेश अधाने, दिलीप माचे, युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, जिल्हायुवा अधिकारी हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, यांनी केले आहे.