‘आम्ही जिजाऊच्या मुली;जशा तलवारीच्या धारा..’

सिंदखेडराजा येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम

औरंगाबाद,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- ‘ आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा..’ या शब्दांना खणखणत्या आवाजात सादर करून शूर जिजाबाईंना अभिवादन बुधवारी अभिवादन करण्यात आले.सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातकलाकारांनी पोवाडे, स्फूर्तीगीतातून जिजाऊंची महती सांगितली. जिजाऊ ब्रिगेडच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष ॲड.वैशाली कडू यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Displaying IMG-20220112-WA0097.jpg


जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ‘जागर शिवशाहीचा’ कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या लोककला प्रशिक्षण वर्गाचे युवा शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या संचाने यावेळी दिमाखदार सादरीकरण केले. ‘ नमितो आधी आई जिजाऊंंना..’ हा जिजाऊंचा गण शाहीर अजिंक्य लिंगायत व संच यांनी सादर केला. शाहीर भक्ती मालूरे व संच यांनी जिजाऊ वंदना सादर केली. स्व.शाहीर गोंकूलसिंह लिखित स्फूर्तीगीत ‘ जय जिजाऊ जय शिवराय.. ‘ अजिंक्य लिंगायत व संच यांनी सादर केले. जिजाऊंची ओवी  मालुरे,ॲड.वैशाली कडू, मयुरी राजपूत, स्वराली हिंगे, राधिका गाडे व संच यांनी गायली.

Displaying IMG-20220112-WA0095.jpg

शाहीर देवानंद माळी (सांगली) लिखित ‘ आई जिजाऊ वंदन माझे.. ‘ जिजाऊंचा पोवाडा शाहीर भक्ती मालूरे व संच यांनी सादर केला. सहभागी कलाकारांमध्ये शाहीर अजिंक्य लिंगायत, डफ वादक किशोर धारासुरे, भक्ती मालुरे मयुरी राजपूत, स्वराली हिंगे (वय ११), राधिका गाडे (वय १२), टाळ वादक शुभम केंद्रे, तुतारी वादक दिपक गरड, झांज वादक ऋत्विक चव्हाण, पेटी वादक कृष्णा वाघ, बालकलाकार जगदीश जाधव, अनुज हरणे (वय ११), टाळवादक हर्षवर्धन कडू (वय १०), ॲड.वैशाली कडू, वादक प्रथमेश शेवतेकर आणि झांज वादक दिनेश जगदाळे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. वैशाली कडू यांनी केले.