औरंगाबादेत २१० नवे बाधित,नऊ बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद:

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २१० नवे करोनाबाधित आढळून आले. यात शहर परिसरातील १५७, तर ग्रामीण भागातील ५३ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ६९४० झाली असून, त्यापैकी ३५७१ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र आतापर्यंत ३१८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे व सध्या ३०५१ बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

३७ ते ७१ वयोवर्षांपर्यंतच्या नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान शहरात मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना येथील ३७ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ३१८ झाली आहे.

पडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला ५ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे त्याचदिवशी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा रविवारी सकाळी साडेसातला मृत्यू झाला. एसटी कॉलनीतील ७१ वर्षीय महिला रुग्णाला ८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे दुसऱया दिवशी स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी मध्यरात्री साडेबाराला मृत्यू झाला. अजिंठा (ता. सिल्लोड) येथील ७० वर्षीय महिला रुग्णाला ३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्वॅब रिपोर्टवरुन निदान झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी पहाटे साडेतीनला मृत्यू झाला. जालना येथील म्हाडा कॉलनीतील ३७ वर्षीय पुरुष रुग्णाला ३० जून रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते आणि रुग्णाला पूर्वीपासून मूत्रपिंडविकार होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा सोमवारी पहाटे सहा वाजता मृत्यू झाला. एन-११ हडको येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाला २९ जून रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा रविवारी रात्री साडेअकराला मृत्यू झाला. जाधववाडी येथील ५३ वर्षीय महिला रुग्णास ५ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा सोमवारी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी मृत्यू झाला. सिडको एन-नऊ परिसरातील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला एक जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी सकाळी साडेदहाला मृत्यू झाला. न्यू हनुमान नगर येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला २८ जून रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले असतानाच रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता मृत्यू झाला. तर, शहरातील एका खासगी रुग्णालयात राजा बाजार येथील ६० वर्षीय पुरूष करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१८ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीत १५७ बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये घाटी परिसर येथे १, जाधवमंडी ३, अरिष कॉलनी ३, सिडको एन-११ येथे ३, दिल्ली गेट १, गजानन नगर ४, पुंडलिक नगर १, छावणी २, किराणा चावडी १, एन-११ हडको १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, नाईक नगर ४, उस्मानपुरा ५, उल्कानगरी २, शिवशंकर कॉलनी ८, एमआयडीसी, चिखलठाणा १, मातोश्री नगर २, नवजीवन कॉलनी १, श्रध्दा कॉलनी १,  एन-सहा १, एन-दोन सिडको, ठाकरे नगर १, जटवाडा रोड १, पोलिस कॉलनी २, दशमेश नगर ७, वेदांत नगर १, टिळक नगर १, एन-नऊ सिडको १, प्रगती कॉलनी १, देवळाई, सातारा परिसर २, जयभवानी नगर ३, अंबिका नगर १, गजानन कॉलनी ३, पदमपुरा १५, सिंधी कॉलनी १, पडेगाव २, सिल्कमिल कॉलनी ४, रेल्वे स्टेशन परिसर ४, टीव्ही सेंटर ४, रुणवाल रेसिडेन्सी २, हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा १, नारळीबाग २, संभाजी कॉलनी ३, अविष्कार कॉलनी एन-सहा सिडको १, विठ्ठल नगर, कांचनवाडी ८, दत्तनगर कांचनवाडी २, कांचनवाडी १, शिवाजीनगर ३, रेणुका नगर ४, एमरल्ड सिटी १, भारत नगर ३, छत्रपती नगर ७, विश्वभारती कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, ज्युबली पार्क १, जयभवानी नगर १, बालाजी नगर १, जाधवमंडी १, अमृतसाई, रेल्वेस्टेशन १, हर्सूल १, उत्तमनगर १, बेगमपुरा १, सुधाकर नगर, सातारा परिसर १, नक्षत्रवाडी १, बीड बायपास १, एन-११ मयुर नगर २, गजानन कॉलनी २ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ५३ बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये विहामांडवा येथील १, सिद्धेश्वर नगर, सुरेवाडी १, कारंजा १, वाळूज १, हिरापूर सुंदरवाडी ३, स्वस्तिक सिटी, साजापूर, बजाजनगर २, सावरकर कॉलनी, बजाज नगर २,  वडगाव बजाज नगर २, निलकमल सोसायटी, बजाज नगर ४, साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर ५, साऊथ सिटी, बजाज नगर १, दिशा कुंज, वडगाव कोल्हाटी १, सायली सोसायटी बजाज नगर ३, शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी २, जिजामाता सोसायटी, बजाज नगर ३,  पंचगंगा सोसायटी, बजाजनगर १, विश्व विजय सोसायटी, बजाजनगर २, डेमनी वाहेगांव ३, पैठण ३, इंदिरा नगर, वैजापुर ५, अजिंठा २, शिवना १, फुलंब्री १, कन्नड २, पोलिस कॉलनी, कन्नड १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *