शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अल्पभूधारक शेतकऱ्याचे नुकसान ; वैजापूर तालुक्यातील सोनवाडी येथील घटना

वैजापूर ,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सोनवाडी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरात ठेवलेल्या कपाशीसह कौटुंबिक साहित्य जळून खाक झाले.

Displaying IMG-20220112-WA0210.jpg

काल रात्री ही घटना घडली असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तालुक्यातील सोनवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी मनोज नारायण म्हस्के व रंजनाताई म्हस्के यांच्या घरात काल रात्री शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली.

Displaying IMG-20220112-WA0213.jpg

या आगीत घरात ठेवलेले कापूस, शेती अवजारे व घरातील साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे जळीत झाल्या कारणाने मनोज म्हस्के यांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.