राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना स्मशानजोगी महिलांतर्फे अभिवादन

औरंगाबाद,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- राजमाता जिजाऊ माता यांना जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त स्मशानजोगी महिलांतर्फे एन -६ सिडको येथील स्मशानभूमी येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवा स्मशानजोगी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी गोविंद गायकवाड, गणेश गायकवाड, अनिल गायकवाड, गंगाधर पवार, एल्लपा शेळके यांच्यासह रेणुका पवार, निर्मला पवार,सुनीता गायकवाड, चंद्राबाई गायकवाड, सावित्रीबाई शेळके आदींची उपस्थिती होती.