राज्यातील पर्यटन स्थळे ५० टक्के निर्बंधासह सुरू करावी

पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार अंबादास दानवे यांची मागणी

औरंगाबाद,११ जानेवारी / प्रतिनिधी :- पर्यटन स्थळे बंद केल्यामुळे यावर उपजीविका असणारे गाईड ,कार- बस आणि टॅक्सी ऑपरेटर, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि पर्यटन उद्योगातील छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यावर आर्थिक ताण पडून, मानसिक दृष्ट्या नकारात्मक प्रभाव वाढत आहे, त्यामुळे याचा विचार करून राज्यातील पर्यटन स्थळे ५० टक्के उपस्थितीत व निर्बंधासह सुरू करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Displaying IMG-20220111-WA0010.jpg


 याबाबत मंत्री महोदय आदित्य ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मागील दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीशी आपण लढत असताना दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनास पोषक वातावरण निर्माण झाले होते. नोव्हेंबर २०२१ नंतर अर्थचक्र पूर्वपदावर येत असतानाच ओमायक्रोन आणि वाढत्या रुग्णसंख्येने यात आडकाठी निर्माण केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ऐन हंगामात पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे पर्यटन स्थळावर उपजीविका असणाऱ्याना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे व मानसिक दृष्ट्याही खचत आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून जसे हॉटेल, सिनेमा थिएटर, खाजगी कार्यालय व इतर ठिकाणी  ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिलेली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील पर्यटन स्थळे निर्बंध लावून खुली करण्यात यावी अशी मागणी आमदार दानवे यांनी केली आहे.