करदात्यांना पुन्हा दिलासा, आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या काय आहे नवी तारीख

नवी दिल्‍ली,११ जानेवारी / प्रतिनिधी :-जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

कोविड महामारीमुळे करदाते तसेच इतर भागधारकांना येत असलेल्या अडचणी तसेच आयकर कार्यदा 1961 मधील तरतुदींनुसार विविध लेखा परीक्षण अहवालांच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मूल्यमापन वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र तसेच विविध लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची कालमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता 15 मार्चपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार Assessment Year 2021-22 साठी इन्मक टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी आयटीआर फाइल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

एफ. क्र.225/49/2021/ITA-II  मधील सीबीडीटी परिपत्रक क्र.01/2022 11.01.2022 ला जारी केले आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in. वर उपलब्ध आहे.