औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचे त्रिशतक

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

औरंगाबाद जिल्ह्यात 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 32 जणांना (मनपा 28, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 317 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 51 हजार 183 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (276)

ऑरेंज सिटी 1, मिलेनियम पार्क 1, सदाशिव नगर 1, शिवाजी नगर 4, एन- तीन येथे 3, बीड बायपास 4,  कासलीवाल तारांगण 1, सातारा परिसर 1, गारखेडा 2, एन- चार येथ 5, उल्कानगरी 2, सिडको 1, हनुमान नगर 1, चार्ला नगर 1, राज नगर 1, बसैये नगर 1, संजय नगर 1, एन-दोन येथे 2, म्हाडा कॉलनी 2, पैठण रोड 1, औरंगपुरा 1, इटखेडा 1, बन्सीलाल नगर 3, समर्थ नगर 2, वेदांत नगर 3, पडेगाव 6, राजा बाजार 1, उस्मानपुरा 2, रेल्वे स्टेशन 1, अहिंसा नगर 1, टाऊन सेंटर 1, भानुदास नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, कांचनवाडी 1, देवा नगरी 1, रामनगर 1, भोईवाडा 1, नवाबपुरा 1, हनुमान नगर 1, पद्मपुरा 2, वेदांत नगर 1, पैठण रोड 1, श्रेय नगर 1, मयूर पार्क 1, भगतसिंग नगर 1, बेगमपुरा 1, अन्य 202

 ग्रामीण (41)

औरंगाबाद 12, फुलंब्री 1, गंगापूर 11, कन्नड 3, खुल्ताबाद 1, वैजापूर 5, पैठण 8

Displaying _DSC5106.JPG

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला बूस्टर डोस

Displaying _DSC5066.JPG

 कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी  शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले.

जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाधिकारी यांनी बूस्टर डोस घेतला. याप्रसंगी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, श्रीमती  संगीता चव्हाण, संगीता सानप, लसीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. महेश लड्डा यांची उपस्थिती होती.

            कोविड अनुरूप वर्तनाचे तंतोतंत पालन करावे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क  परिधान करणे, शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांनीही प्रतिबंधक लस घ्यावी.  कोरोनापासून बचाव होण्यासाठी लस अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Displaying _DSC5087.JPG

लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर सीटी स्कॅन यंत्राची पाहणीही त्यांनी केली.