औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाने द्विशतक केले पार

औरंगाबाद,९ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 34 जणांना (मनपा 29, ग्रामीण 05) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 352 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 234 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 866 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 856 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (183)
हडको कॉर्नर 1, सिडको एन वन 1, मिलिट्री हॉस्पिटल 1, छावणी परिसर 2, सिद्धार्थ उद्यान परिसर 1, विमानतळ परिसर 2, शहानूरमियाँ दर्गा परिसर 3, राजा बाजार परिसर 1, एन तीन सिडको 2, एन चार परिसर 1, एन अकरा हडको 1, एन दोन ठाकरे नगर 2, एन दोन सिडको 1, विठ्ठल चौक, राम नगर 1, कैलास नगर 1, बीड बायपास 5, व्यंकटेश नगर 1, समृद्धी नगर 1, वेदांत नगर 1, पैठण गेट 1, स्टेशन रोड 2, उस्मानपुरा 2, कोकणवाडी 2, श्रेय नगर 1, कांचनवाडी 3, शंभू नगर 2, बाळकृष्ण नगर 1, उल्कानगरी 1, नवीन शांतिनिकेतन कॉलनी 2, केशर नगर 2, भवानी नगर 1, सिडको परिसर 1, बन्सीलाल नगर 2, शिवाजी नगर 2, सुधाकर नगर 1, श्रेय नगर 1, हनुमान नगर 1, एन नऊ 1, एन सहा 2, एन अकरा 1, सम्राट नगर 1, जालान नगर 1, श्रीनिकेतन कॉलनी 1, नारळीबाग परिसर 1, सिडको एन तीन 1, अरिहंत नगर 1, गारखेडा परिसर 7, शाहनूरवाडी 1, पहाडसिंगपुरा 1, एन पाच सिडको 1, एन सात सिडको 6, एन आठ 1, बाबा पेट्रोल पंप परिसर 1, रशीदपुरा 1, मनजीत नगर 1, बायजीपुरा 1, अन्य 95
ग्रामीण (51)
औरंगबाद 12, फुलंब्री 3, गंगापूर 10, कन्नड 3, खुलताबाद 5, सिल्लोड 2, वैजापूर 9, पैठण 7