औरंगाबाद जिल्ह्यात 162 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, 656 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,८ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 33 जणांना (मनपा 29, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 318 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 162 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 632 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 656 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (108) एन आठ सिडको 1, एन सात 3, लक्ष्मी कॉलनी 2, ज्योती नगर 1, तोष्णीवाल चौक 1, मोतीवाला नगर 1, एन चार सिडको 2, एन दोन सिडको 1, बीड बायपास 1, आकाशवाणी परिसर 1, जवाहर कॉलनी 1, समर्थ नगर 1, उस्मानपुरा 2, नंदनवन कॉलनी 2, पद्मपुरा 1, केशव नगरी 1, गजानन कॉलनी 1, पैठण रोड 1, एन सहा सिडको 3, न्यू विशाल नगर 1, विमानतळ परिसर 1, घाटी परिसर 2, एन वन सिडको 4, बागला चौक 1, चिकलठाणा परिसर 1, गारखेडा परिसर 2, गुलमंडी 1, कैसर कॉलनी 1, शरीफ कॉलनी 1, कामगार चौक 1, हर्ष नगर 1, ज्योती नगर 2, सृष्टी नगर 1, बन्सीलाल नगर 1, गादिया विहार 1, जय नगर 2, सिद्धांत नगर 1, म्हाडा कॉलनी 1, सुराणा नगर 1, पुंडलिक नगर 1, एन तीन 1, केशव नगर 1, अन्य 51

ग्रामीण (54) औरंगबाद 07, फुलंब्री 1, गंगापूर 9, कन्नड 6, खुलताबाद 3, सिल्लोड 5, वैजापूर 11, पैठण 12