लातूरमध्ये २०० बेडचे कोवीड-१९ डेडीकेटेड रूग्णालयाची उभारणी

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी

लातूर, दि.6 : विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्था परीसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अदययावत अशा सर्वसुवीधांनीयुक्त २०० बेडच्या कोवीड१९ डेडीकेटेड रूग्णालयाची निर्मीर्ती करण्यात आली असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी भेट देऊन पाहणी केली. वैदयकीय महाविदयालयाच्या परीसरातील सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल रूग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे.

सदयाची कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थ्ीती लक्षात घेता वा वाढत्या रूग्णावर तातडीने उपचार करता यावेत ही बाब लक्षात घेऊन या ठीकाणी २०० बेडचे कोवीड१९ डेडीकेटेड रूग्णालय उभारण्यात आले आहे. येथील सर्व बेडना ऑक्सिजन पुरवठयाची सुवीधा असून ६० वेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. या ठीकाणी स्वतंत्र नोंदणी विभाग तसेच अदयावत अशी क्षकीरण, सोनोग्राफी यंत्रणा बसविण्यात आली आहे. येथे स्वतंत्र डायालीसीसची व्यवस्था आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनंतर वैदयकीय महाविदयालयाने या कोवीड१९ डेडीकेटेड रूग्णालयाची निर्मीती केली आहे. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या कोवीड१९ डेडीकेटेड रूग्णालयास भेट दिन्या नंतर तेथे उभारलेल्या एकुण सोयीसुवीधा बददल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, डॉ.अनिल मुंडे, डॉ. महादेव बनसोडे, डॉ.उमेश लाड, डॉ.मंगेश सेलुकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.बी.सोनटक्के, व्ही.वाय. आवाळे,वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक बी.वाय. गड्डीया, सहाय्यक अभियंता व्ही.मोहन कृष्णा, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *