महिला वकिलाची बदनामी करणाऱ्या माथेफिरुला अटक

आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

औरंगाबाद,८ जानेवारी /प्रतिनिधी:-महिला वकीलाचा मोबाइल क्रमांक कॉलगर्ल म्हणुन व्‍हायरल केल्यानंतर तोच क्रमांक अश्लिल ग्रुपवर अॅडकरुन महिला वकीलाची बदनामी करणाऱ्या माथेफिरुला पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे उस्‍मानाबादेतून अटक केली.

मिनाज अकील शेख (२१, रा. चिंचपुर बु. ता. परंडा जि. उस्‍मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी दिले.

या प्रकरणात २४ वर्षीय महिला वकीलाने फिर्याद दिली. त्‍यानूसार, ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी सव्‍वा अकरा वाजेच्‍या सुमारास पीडिता ही घरी असतांना तिच्‍या व्‍हॉट्स अॅपवर ९९०७७९२९९४ या क्रमांकावरुन हाय असा मॅसेज आला. त्यानंतर ८३४९६९६९०८ या मोबाइल क्रमांकावरुन पुन्‍हा एक मॅसेज आला, त्‍यात एका मुलाने तुमचा मोबाइल क्रमांक एका अश्लिल ग्रुपला अॅड केला असल्याचे सांगत त्‍या ग्रुपचे काही स्‍क्रीन शॉट पीडितेच्‍या मोबाइलवर पाठवले. त्‍याच दिवशी दुपारी सव्वा एक वाजेच्‍या सुमारास पीडितेच्‍या व्‍हाट्स अॅपवर ९९०७७९२९९४ या क्रमांकावरुन आणखी एक अश्लिल ग्रुपचा स्‍क्रीन शॉट पाठविण्‍यात आला. त्‍यात ८६६८७०१७२७ या मोबाइल धारकाने पीडितेचा मोबाइल सेक्स कॉल गर्ल म्हणुन पाठविल्याचे समोर आले. दुपारी पावणेपाच वाजेच्‍या सुमारास पीडितेला ७३८५९७५३६५ या क्रमांकावरुन एका मुलीचा फोन आला, ती म्हणाली की, मला माझ्या मैत्रणीचा मोबाइल क्रमांक शेअर करायचा होता, मात्र चुकून तुमचा क्रमांक शेअर झाला, असे सांगत फोन बंद केला. ६ डिसेंबर २०२१ रोजी पीडितेने सायबर पोलिस ठाणे गाठुन ८६६८७०१७२७ या मोबाइल धारका विरोधात तक्रार दिली. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन आरोपी मिनाज शेख याच्‍या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून गुन्‍ह्यात वापरलेला मोबाइल पोलिसांनी जप्‍त केला. चौकशी केली असता, त्‍याने गुन्‍ह्यात वापरलेले समी कार्ड (८६६८७०१७२७) कार्ड तोडून नदीन फेकुन दिल्याची कबुली दिली. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी गुन्‍ह्याचा सखोल तपास करायचा आहे.या गुन्‍ह्यात पीडितेला फोन करणाऱ्या त्या महिलेचा शोध घेवून तपास करायचा आहे. तसेच गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.