राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! ३६,२६५बाधितांची नोंद,ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले

औरंगाबाद जिल्ह्यात 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

मुंबई,६ जानेवारी /प्रतिनिधी:- राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन बाधितांचा आकडा देखील एक हजाराच्या दिशेने सरकू लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 36 हजार 265 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्याच आजपर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या आता 67 लाख 93 हजार 297 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.

दिवसभरात एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या रुग्णवाढीतील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत नोंदवली गेली असून मुंबईत तब्बल 201818 नव्या रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकूण 8 हजार 907 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनची वेळ पुन्हा येणार का, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. कारण वाढती रुग्णवाढ आरोग्य आणि प्रशासनावरील ताण वाढवण्याची शक्यता आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत.

 आज दिवसभरात एकूण 13 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता 1 लाख 41 हजार 594 झाला आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर 2.08 टक्के आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी  राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. ही बैठक पार पडल्यानंतर मुंबई लोकल ट्रेन आणि लॉकडाऊन संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर राजेश टोपे यांनी माहिती दिली. मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याबाबत अजून कोणताही निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नसल्याचे तसेच जिल्हांतर्गत बंदी तूर्त कुठेही केली नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.काल राज्यात २५ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील १५ हजार रूग्ण केवळ मुंबई शहरातील आहेत. मुंबई शहरात काल ६० हजार टेस्ट करण्यात आल्या असून दहा टक्के रुग्ण शहरात आढळून आले. असे असले तरी २० टक्क्यांच्या आतच रुग्णालयातील बे़ड वापरात आहेत. ८० टक्के बेड अजूनही रिकामे आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरीही बेडची उपलब्धता मोठी आहे. ऑक्सिजनची मागणी आणि मृत्यूदर कुठेही वाढलेला नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. या साऱ्याचे मोठे श्रेय हे मुंबईच्या लसीकरण मोहीमेला जाते असेही आरोग्यमंत्री म्हणाले.राज्यात अनावश्यक गोष्टींसाठी मेळावे, एकत्र येण्यावर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ

दरम्यान, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 79 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता 776 इतका झाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये मुंबईत 57, ठाण्यात 7, नागपूरमध्ये 6, पुण्यात 5, पुणे ग्रामीणमध्ये 3 तर पिंपरी चिंचवडमध्ये एका बाधिताची नोंद झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांना (मनपा 25, ग्रामीण 03) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46  हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 287 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (111)

शक्ती नगर 2, सिडको  1, उल्का नगरी 2, कांचनवाडी 1, भूईवाडा 1, एन-नऊ येथे 1, पीसादेवी 1, पडेगाव 4, रेल्वेस्टेशन  1, कमलनयन बजाज दावखाना  1, वेंदात नगर 3, नक्षत्रवाडी  1, बीड बायपास 4, रामनगर 1, एन-वन येथे 1, शेंद्रा 1, अविष्कार कॉलनी 1, एन- दोन येथे 1, एन-चार येथे 3, भवानीनगर 1, आरेफ कॉलनी 1, टी.व्ही सेंटर 1, उस्मानपुरा 3,आरपीएफ 1, आकाशवाणी 1,  प्रताप नगर 1,  म्हाडा कॉलनी दर्गा रोड 1, बन्सीलाल नगर 1, खडकेश्वर 1,शिवाजीनगर 2, विमानतळ 1, चाणक्यपुरी 1, एमआयटी हॉस्पिटल 1, गणेश नगर 1, शहानुरवाडी 1, जुना बाजार 1, सातारा परिसर 1, विद्युत कॉलनी 1, चिकलठाणा 1, श्रेय नगर 1,  अन्य 56

 ग्रामीण (17)

औरंगाबाद 12, कन्नड 2, खुलताबाद 1, पैठण 2