सामाजिक -आर्थिक स्वातंत्र्यासाठी पत्रकारांनी लेखणी झिजवावी – माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे

नांदेड ,६ जानेवारी /प्रतिनिधी:- राजकीय स्वातंत्र्यासाठी बाळशास्त्री जांभेकर , बाबूराव पराडकर या दोन मराठी पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे.स्वातंत्र्याबद्दलचे स्फुल्लींग भारतीयांच्या मनात चेतविणारी पत्रकारीता प्रेरणादायी होती. स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक आर्थिक स्वातंत्र्यासाठी आता पत्रकारांनी लेखणी झिजवावी असे आवाहान माजी कुलगुरू तथा माध्यम तज्ञ डाॅ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

डाॅ.सुधीर गव्हाणे यांनी बाळशास्त्री जांभेकरांचे मराठी पत्रकारीतेत असणाऱ्या योगदानाचे विश्लेषण करून आ.कृ वाघमारे यांनी निजामशाहीच्या दडपशाहीला न जुमानता केलेल्या झुंझार पत्रकारिता मराठवाड्याच्या पत्रकारीतेला उंचीवर घेऊन गेली असे सांगितले . साने गुरूजी , पंडीत जवाहरलाल नेहरू , स्वातत्र्यवीर सावरकर , सुभाषचंद्र बोस , म. गांधीजी यांची पत्रकारिता स्वातंत्र्य संग्रामाला गतिमान करण्यासाठी केलेली तेजस्वी पत्रकारिता होती ती आजही प्रेणादायी आहे असे डॉ गव्हाणे म्हणाले

या वेळी बोलताना डाॅ. गव्हाणे म्हणाले की राजकीय स्वातंत्र्या सोबत म. ज्योतीराव फुले यांची सत्यशोधकांची पत्रकारीता , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची लोकपत्रकारीता ही सामाजिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कासाठी तितकीच मोलाची पत्रकारिता होती .स्वतंत्र पत्रकारिताच प्रगल्थ लोकशाहीला जन्म देते पगल्भ लोकशाही सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करते असे ही ते म्हणाले
पत्रकारितेत होत असलेले प्रदूषण घातक आहे ,समाज हिताची पत्रकारिता झाली पाहिजे असे सांगून डॉ गव्हाणे म्हणाले की ,निर्भय,निरपेक्ष पत्रकारिता अजरामर राहते.
या वेळी बोलताना कुलगुरु डॉ उध्वव भोसले यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगती सोबतच माध्यमांनी केलेल्या प्रगतीचा मागोवा घेतला. बदलत्या तंत्रा सोबत बदल घडवून आणणे गरजे चे आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी तत्कालीन पत्रकारिता खूप प्रभावी ठरल्याचे डॉ भोसले यांनी सोदाहरण सांगितले. आजच्या बदलत्या परिस्थितीत सकारात्मक पत्रकारितेची गरज असल्याचेही ते म्हणाले
या वेळी बोलताना प्र कुलगुरु डॉ जोगेंदर सिंह बिसेन यांनी पत्ररितेच्या उज्ज्वल इतिहासाची माहिती दिली , इतिहासातून आपण शिकलो पाहिजे असे ही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा.डाॅ. दिपक शिंदे यांनी केले.तर संचालन व आभार डॉ राजेंद्र गोणारकर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. सुहास पाठक , डाॅ. सचिन नरंगले , डाॅ.कैलास यादव व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .