रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वैजापूर पंचायत समितीच्या सभापती मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण

वैजापूर,६ जानेवारी /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लासुरगाव, शहाजतपुर, जळगांव  व पालखेड रस्त्याचे डांबरीकरण काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी वैजापूर पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मनाजी मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांनी बुधवारी जळगाव येथे बाबाजी मंदिराच्या परिसरात उपोषण सुरू केले आहे.  

या उपोषणात पंचायत समितीच्या सभापती सिनाताई  मिसाळ सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ , शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, भरतआण्णा जगताप ,प्रविण सोनवणे, किशोर हुमे, विष्णू शेजुळ, जयेश बनकर, विठ्ठल डमाले,  प्रवीण भाडाईत, विजय शेळके ,सरपंच संभाजी पाटील जगताप, अरुण मातेरे ,राजेंद्र भाडाईत, कांतीलाल खारतोडे, दिलीप घेर, चंद्रभान हजारे ,शिवाजी वाळुंज, राजेंद्र नवले, प्रभाकर डोंगरे, रावसाहेब बुणगे, सुरेश नवले, पंकज गायकवाड, भास्कर गाईकवाड, सुनील पेमभरे, संदीप गाडे, राहुल मोरे, दिगंबर नवले ,संभाजी काळुंके, सरपंच किरणताई  जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.