औरंगाबाद शहरातील सिटी चौक ते नौबत दरवाजा किलेअर्क परिसरातील दहा बांधकामे पाडली

औरंगाबाद,५ जानेवारी /प्रतिनिधी:- महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि व्हीआयपी रोड रस्त्याला मिळणाऱ्या 30 मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता मधील बाधित व इतर अतिक्रमणे आज पाडली.

शहरातील ऐतिहासिक दरवाजा लगत आणि आणि पंचकुवा कब्रस्थान लगत हा रस्ता रंगारगल्ली सिटी चौक पासुन सरळ व्हीआयपी रोड येथे मिळतो. सदर रस्त्या मध्ये एक मोठा ब्रिज सुद्धा बांधण्यात आला आहे. तसेच ऐतिहासिक दरवाजा पंचकुवा कब्रस्थानची अंदाजे 400 मीटर ची सुरक्षा भिंत सुद्धा निष्कासित करण्यात आली. निष्कासित करते वेळी कब्रस्तान समितीचे सर्व पदाधिकारी यांनी विकास जर होत असेल तर आमची काही हरकत नाही म्हणून सदर सुरक्षा भिंत काढण्यासाठी संमती दिल्यानंतर जेसीबीच्या साह्याने ती काढण्यात आली.


तसेच नवीन ब्रिज पासून पुढे एकूण 10 रहाते घरे निष्कासित करण्यात आले. यामध्ये चार घरांचे रस्त्यावर अतिक्रमण होते. किलेअर्क आणि पंचकुआ कब्रस्तान परिसरातील नागरिकांनी सदर मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला व स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सुरुवात केली. ज्या ठिकाणी पक्के बांधकामे झाली होती ती जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने आज एकूण 10 रस्ता बाधित मालमत्ता व इतर अतिक्रमणे काढण्यात आली.

ऐतिहासिक नौबत दरवाजा व काळा दरवाजा यांचे सुशोभीकरणाचे  काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू आहे .दोन्ही दरवाजे लागत असलेले अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. सदर कारवाई प्रशासक श्री अस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, श्रीमती सविता सोनवणे ,सिटी चौक पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मोसिन ,पदनिर्देशित अधिकारी आर एस राचतवार ,इमारत निरिक्षक सय्यद जमशेद , पंडित गवळी, मजर आली ,रामेश्वर सुरासे ,नगररचना विभागाचे श्री कोंबदे ,कारभारी घुगे, रितेश तुळशीबागवाले ,विद्युत विभागाचे कर्मचारी ,मनपा पोलीस कर्मचारी , मजूर ,जेसीबी चालक जीप चालक यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती सय्यद जमशेद यांनी दिली आहे.