औरंगाबादमधील शाळा गुरुवारपासून बंद

पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद

औरंगाबाद,५ जानेवारी /प्रतिनिधी:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यामुळे औरंगाबादधील शाळाही उद्यापासून म्हणजेच 6 जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गुरुवारपासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.

Aurangabad school Letter
महापालिका प्रशासकांचा आदेश

कोरोना रुग्णांची शंभरी पार

4 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. या दिवशी जिल्हाभरात 103 रुग्णसंख्या नोंदली गेली.5 जानेवारी रोजी हा आकडा १२० झाला आहे.  त्या आधी संपूर्ण आठवड्यातील रुग्णसंख्येत हळू हळू वाढ दिसून येत होती. मात्र रुग्णांनी पन्नाशी पार केलेली नव्हती. 4 ,5 जानेवारी रोजी अचानक रुग्णांनी शंभरी पार केल्याने ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याची शंका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज लगेच 5 जानेवारी रोजी औरंगाबाद महापालिकेनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.