नागरिकांमध्ये वित्तीय साक्षरता वाढली पाहिजे- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

नाबार्ड तर्फे वित्तीय समावेशन अभियानातंर्गत 4 मोबाईल व्हॅनचे लोकार्पण       

Displaying _DSC4652.JPG

औरंगाबाद,५ जानेवारी /प्रतिनिधी:- जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना व त्यांचा लाभ पोहचविण्यासाठी आणि जीवनमान उंचविण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), महाराष्ट्र ग्रामीण बँक, व बँक ऑफ महाराष्ट्राद्वारे वित्तीय समावेशन अभियानाच्या माध्यमातून महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना वित्तीय साक्षर करण्यात येणार आहे. कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात डिजिटल  व्यवहार झाले असून सर्वसामान्य नागरिकांनीही डिजिटल  व्यवहाराचा वापर केला पाहिजे. तसेच सर्व बँकानीही या डिजिटल  व्यवहारात अधिकाधिक सुरक्षितता आणण्यासाठी प्रयत्नरत असावे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले.

Displaying _DSC4613.JPG

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व महाराष्ट्र ग्रामीण बँके मार्फत आज वित्तीय समावेशन अभियानाच्या विशेष कार्यक्रमाचे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत (गोलवाडी शाखा) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.कराड बोलत होते. यावेळी नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी.एस.रावत, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक महेंद्रकुमार काबरा, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद घारड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अतिरीक्त्‍ आयुक्त अविनाश पाठक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इत्यादी राष्ट्रीयकृत बँकेसह महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आदी बँकांचे राज्यपातळीवरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Displaying _DSC4600.JPG

डॉ.कराड म्हणाले, सर्वात गरीब घटकांपर्यत बँक व बँकींग सुविधा मिळाली पाहिजे. वित्तीय समावेशन अभियान देशस्तरावर राबविण्यात येत असून राज्यातही या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य विशेषत: ग्रामीण भागातील जनता वित्तीय साक्षर झाली पाहिजे. त्यासाठी बँकांनी विविध उपक्रमांतून अधिक जनजागृती करण्यावर भर द्यावा. कोरोना काळात आरोग्य विभाग, पोलीस विभागाप्रमाणे बँक अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना चांगली सुविधा दिली आहे. देशातील नागरिकांचे मोठ्या संख्यने जनधन खाते आतापर्यंत काढण्यात आले असून मुद्रा योजना, रुपे बँक, प्रधानमंत्री स्ट्रिट व्हेंडर कर्ज योजना बँकांमार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. त्याच बरोबरीने नागरिकांमार्फतही बँकेचे सर्व व्यवहार डिजिटल पध्दतीने होण्यासाठी या व्यवहारांत सुरक्षितता येण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. पंजाब नॅशनल बँक व नाबार्ड मिळून शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचेही श्री.कराड यावेळी म्हणाले.

Displaying _DSC4631.JPG

नाबार्डचे जी.एस.रावत आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे महेंद्रकुमार काबरा यांनी वित्तीय समावेशन अभियान राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी नाबार्ड तर्फे वित्तीय समावेशन अभियानातंर्गत विभागास 16 मोबाईल व्हॅन पैकी 4 मोबाईल व्हॅनचे डॉ.कराड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी उस्मानाबाद, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व वर्धा येथील बँक अधिकारी यांच्यासोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून या जिल्ह्यातील वित्तीय समावेशन अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील मोबाईल व्हॅनचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.