डॉ.रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार दीपा सुरेश पाटील यांना व डॉ.भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार ज्योती पठानिया यांना घोषित

औरंगाबाद,५ जानेवारी /प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ.रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार दीपा सुरेश पाटील यांना तर डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार-ज्योती पठानिया यांना घोषित करण्यात आला आहे. 

हे पुरस्काराचे चौथे वर्ष आहे.रोख रक्कम रु २१०००/- (रु एकवीस हजार मात्र),सन्मान पत्र,सन्मान चिन्ह ,महावस्त्र, श्री फळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.ही माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी दिली.या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष श्री शिरीष कुलकर्णी , कार्यवाह डॉ. सुहास आजगावकर ,  पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रमुख डॉ. विशाल बेद्रे तसेच  जनसंपर्क विभाग प्रमुख डॉ. प्रसन्न पाटील  हे उपस्थित होते.

मागील तीन वर्षांपासून संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पुरस्कार प्रदान केले जात आहेत . पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.

भारतात दीर्घकाळ वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉ रखमाबाई राऊत ह्या सेवेचे मूर्तिमंत प्रतिक आहेत. त्यांनी बालविवाह सारख्या कुप्रथे विरुध्दी जोरदार लढा दिला होता. त्याचाच परिणाम म्हणून बालविवाह प्रतिबंधक कायदा आला. त्यांच्या नावाने डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार दिला जातो.

बेरड,रामोशी,भटक्या समाज आणि देवदासींच्या उत्थानासाठी आणि पुनर्वसनासाठी आ.भारतीय बेरड- रामोशी सेवा समिती, उत्थान देवदासी पुनर्वसन आंदोलन, भटके विमुक्त विकास परिषद, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठाण, सामाजिक समरसता मंच, समरसता साहित्य परिषद आणि समरसता संमेलन अशा विविध माध्यमातून आपले आयुष्य समर्पित करणारे डॉ भीमराव गस्ती. बेरड समाजात जन्म घेऊन ही त्यांनी जिद्धीने शिक्षण घेतले.ते रसायनशास्त्राचे 

संशोधक होते. रशियातील जगदविख्यात विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पी.एच.डी. प्राप्त  केल्यानंतर काहीं काळ त्यांनी उस्मानिया  विद्यापीठात अध्यापन कार्य केले.बेळगाव परिसरातील बेरड रामोशी समाजाची स्थिती पाहून हे अध्यापन कार्य सोडून  त्यांनी बेरड रामोशी – देवदासींसाठी आपले जीवन समर्पित केले. ते त्याग, प्रबोधन आणि सेवेचे मूर्तिमंत प्रतिक होते. त्यांच्या नावे डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार संस्था देत आहे.

डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार

Displaying श्रीमती दीपा पाटील.jpg

श्रीमती दीपा सुरेश पाटील, संस्थापक संचालिका, “संवेदना” – सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र लातूर. ताईंचे कार्य अत्यंत आव्ह्नात्मक ,कठीण आणि म्हणूनच स्पृहणीय आहे.त्यांना हा पुरस्कार देवून त्यांच्यातील मातृदेवतेस विनम्र वंदन करीत आहोत असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार

Displaying श्रीमती ज्योती पठानिया.jpg

श्रीमती ज्योती दिग्विजय सिंह पठानिया, संस्थापक- संचालिका, “चैतन्य महिला मंडळ”, पुणेदीदींचा सन्मान हा ह्या पुरस्काराचाच सन्मान आहे.

साध्वी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  शनिवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ०५:०० वा. दामू अण्णा दाते सभागृह, तिसरा मजला, डॉ हेडगेवार रुग्णालय, औरंगाबाद येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास  प्रमुख वक्ते म्हणून श्री सुरेशराव कुलकर्णी, जेष्ठ प्रचारक , अ. भा. कार्यकारिणी सदस्य , अ.भा. वनवासी कल्याण आश्रम तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रमेश उपाख्य भाईश्री पटेल, जेष्ठ उद्योगपती आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, जालना.  हे  उपस्थित राहणार आहेत.

करोना काळ लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत मर्यादित संख्येत होईल.यु ट्युब आणि फेसबुक वरून या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल.योग्य वेळी त्या साठीची लिंक सर्वाना पाठविण्यात येईल.समाजप्रेमी जनतेने या कार्यक्रमात आभासी पद्धतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक :

https://www.facebook.com/spmesmandal/ 

https://www.youtube.com/channel/UCRWgHFiLmFVMrf9bfYWGiuA