वैजापूर येथे माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर,४ जानेवारी /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय आर,एम वाणी यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना व युवासेना वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते माजी आमदार  आर.एम.वाणी क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आज झाले.

Displaying IMG-20220104-WA0210.jpg

याप्रसंगी आ.अंबादास दानवे. आ. रमेश पाटील बोरनारे,माजी  नगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सच8न वाणी,शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, वैशाली जाधव, लता पगारे, युवा सेनेचे आमीरअली, जिल्हा परिषद सदस्य रामहरीबापू  जाधव, मा.जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, भाऊसाहेब पाटील गलांडे,  नगरपालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश पाटील चव्हाण, कल्याण पाटील जगताप, माजी उपनगराध्यक्ष शेख अकीलव्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशसेठ बोथरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Displaying IMG-20220104-WA0254.jpg

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस स्टेजवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित या क्रिकेट स्पर्धेत एकूण बारा क्रिकेट संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा रविवार ता.9 पर्यंत चालणार आहे. यास्पर्धेचे पहिले बक्षीस एक लाख एकावन्न हजार रुपये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे,  दुसरे बक्षीस एक लाख एक हजार एक रुपये आ.अंबादास दानवे यांच्यातर्फे, तिसरे बक्षीस 71 हजार रुपये आ.रमेश पाटील बोरनारें यांच्यातर्फे तर चौथे बक्षीस 51 हजार रुपये माजी  नगराध्यक्ष साबेरखान यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.याशिवाय अनेक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

या स्पर्धेचा पहिला सामना पोलीस क्रिकेट क्लब, वैजापूर व जेनेरिक क्रिकेट क्लब वैजापूर  यांच्यात झाला. जेनेरिक क्रिकेट क्लबने ने हा सामना 35 धावानी जिंकून विजयी सुरुवात केली.सलीम वैजापूरी या स्पर्धेचे जेष्ठ समालोचक आहेत.