उदगीरच्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

उदगीर ,२ जानेवारी/प्रतिनिधी :- 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.

यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (२ जानेवारी) उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाला आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत त्यात सासणे यांचे नाव एक सारखे होते. याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या ‘मनातील नाव’ही सासणे हेच असल्याने तेच अध्यक्षपदी निवडले जातील, अशी साहित्य वर्तुळातही चर्चा होती. सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. मुंबईच्या संस्थेने भारत सासणे व प्रवीण दवणे यांची नावे सुचविल्याची माहिती समोर आली होती. तर, छत्तीसगडच्या संस्थेने अनिल अवचट यांचे नाव पुढे केले आहे तर पुण्याच्या महाराष्ट्र   साहित्य परिषदेकडून जी तीन नावे महामंडळाला पाठवण्यात आली आहेत त्यात सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे होती. याआधीचे  लागोपाठ तीन संमेलनाध्यक्ष निवडताना  महाराष्ट्र  साहित्य परिषदेने जे नाव सुचवले तेच अंतिम झाले होते. यावेळीही पुण्याच्या यादीत सासणे यांचे नाव होतेच. त्यामुळे सासणे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होते.

२७ मार्च १९५१ रोजी जालना येथे भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म झाला. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी बी.एससी ही पदवी घेतली. यादरम्यान विविध शासकीय अधिकाऱ्याची पद त्यांनी सांभाळली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे यांचे नाव घेतले जाते. त्या काळातील एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. नव्या कथांना आत्मसात करत त्या आपल्या वेगळ्या ढंगात तयार करण्याची कला सासणे यांच्याकडे आहे.

ग्रामीण, आदिवासी, नागर असा समाजजीवनाचे विविध पैलू, सामाजिक परिस्थिती, स्वभावधर्म त्यांच्या कथांमधून उलघडतात. तसेच मानवी जीवनातील असंगतता, नातेसंबंध त्यातील ताणतणाव, मनोविश्वातील गूढ, गुंता त्यांच्या कथांमधून वाचता येतो. तर अनेक कथांमधून गंभीर, शोकाकुल, भावजीवनातील विलक्षण अस्वस्थता दिसून येते. याशिवाय स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म भाग त्यांनी उलगडून दाखवला आहे. आत्तापर्यंत त्यांनी २८ हून अधिक पुस्तके लिहिली आहे.

भारत सासणे हे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 27 मार्च 1952 रोजी जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सीचे शिक्षण पूर्ण केले. विविध शासकीय अधिकारी म्हणून काम केले. विशेषतः 1980 नंतरचा एक दमदार कथालेखक म्हणून त्यांची ओळखय. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडतात.

सासणे यांची साहित्य संपदा

– जॉन आणि अंजिरी पक्षी (पहिला कथासंग्रह)
– विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
– शुभ वर्तमान (कथासंग्रह)
– सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह)
– स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह)
– क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)
– अदृष्ट (दीर्घकथा संग्रह)
– अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)
– अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह)
– आतंक (दोन अंकी नाटक)
– आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)
– ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह)
– कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह)
– चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)
– चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
– जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी)
– चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
– त्वचा (दीर्घकथा संग्रह)
– दाट काळा पाऊस (दीर्घकथा)
– दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)
– दोन मित्र (कादंबरी)
– नैनं दहति पावकः
– बंद दरवाजा (कथासंग्रह)
– मरणरंग (तीन अंकी नाटक)
– राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
– लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)
– वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)