शिवसेनेने मिटवला ७० महिलांचा कायमचा रोजगाराचा प्रश्न

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन वाटप
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले उपक्रमाचे कौतुक

बजाजनगर,२ जानेवारी /प्रतिनिधी:- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने अनेक महिलांचा रोजगार हिरावून घेतला आहे.
त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना भांडवल व अर्थकारण यामुळे घरात बसून राहावे लागले. अनेकांनी ही अडचण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लॉकडाऊन अन्नदान करतांना निदर्शनास आणून दिली. त्यामुळे विधवा, गरजू, महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू तसेच बचतगटातील महिलांना उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ७० शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्ताने या सामाजिक उपक्रमांचा उल्लेख करत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. बजाजनगर येथील त्रिमुर्ती चौकात असलेल्या सिद्धीविनायक गणपती मंदीर परिसरात झालेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात महिलांनी शिवसेनेचे आभार मानले. मुलाचं शिक्षक, घरखर्च भागविण्यासाठी महिला आता शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावणार आहे.


यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार आंबादास दानवे, महानगरप्रमुख आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, शिवअंगणवाडी सेनेच्या राज्य उपाध्यक्ष रंजना कुलकर्णी, उपजिल्हा संघटक अंजली मांडवकर, सरचिटणीस मंजुषा नागरे, उपजिल्हा प्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, महिला आघाडी ताालुका संघटक जयश्री घाडगे, मीरा पाटील, माजी सरपंच सचिन गरड, बबन सुपेकर, माजी नगरसेवक सचिन खैरे, उपशहरप्रमुख विजय सुर्यवंशी, श्रीकांत साळे, कैलास चव्हाण, कैलास भोकरे, विजय उकळे, गणेश नवले, पोपट हांडे, पंडीत नवले, राम पाटोळे, विशाल खंडागळे, सागर शिंदे, किशोर खांड्रे, प्रल्हाद गुळभिये, ज्ञानेश्वर गायकवाड, रोहीत खैरे, अमोल पोटे, नागेश कुकलारे, जितेंद्र आंबेकर, विष्णू उगले, ज्ञानेश्वर साळुंके, गोरख साळुंके, विष्णू जाधव, महिला आघाडीच्या मिरा पाटील, उषा हांडे, छाया जाधव, कांता चव्हाण, दुर्गा मिसाळ, लता माळी, आरती पवार, छाया कुकलारे, अनिता डाहरीया, सविता वैद्य, मंदा पालकर, उषा पालकर, वैशाली जीवरग आदीसह परिसरातील पदाधिकारी व गरजू महिलांची उपस्थिती होती.