केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा

नवी दिल्ली, ३० डिसेंबर/प्रतिनिधी:-

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 साठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, मंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश  आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ सचिवांनी या चर्चेसाठी सहभागी होणाऱ्या सर्वांचे स्वागत केले आणि या विशेष सल्लागार बैठकीचे महत्त्व सांगितले. या बैठकील सहभागी झालेल्या बहुतेक मंत्र्यांनी, त्यांची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना महामारीच्या सर्वात वाईट महिन्यांत आर्थिक मदत केल्याबद्दल, कर्ज घेण्याची मर्यादा वाढवून, राज्यांना एकापाठोपाठ एक पाठबळ देणारे कर्ज प्रदान करून आणि भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य करून मदत केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी या बैठकीतील उपस्थितांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पीय भाषणात समाविष्ट करण्यासाठी अनेक सूचनाही  दिल्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 साठी त्यांनी दिलेली माहिती आणि सूचनांसाठी अर्थमंत्र्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि प्रत्येक प्रस्तावाची छाननी करण्याचे आश्वासन दिले.