भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 143.83 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

गेल्या 24 तासात लसीच्या 63 लाखांहून अधिक मात्रा

गेल्या 24 तासात 13,154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 82,402

नवी दिल्ली,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 63,91,282 मात्रा देऊन,भारतातील कोविड-19  लसीकरण व्याप्तीने 143.83 कोटी (1,43,83,22,742) मात्रांचा टप्पा पार केला. 1,53,47,226 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 7,486 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्येत (महामारीच्या आरंभापासून) वाढ होऊन ती 3,42,58,778 झाली आहे. परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.38% इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 63  दिवसांपासून दररोज 15,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.  गेल्या 24 तासात 13,154 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 82,402.आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,99,252 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 67.64 कोटींपेक्षा जास्त  (67,64,45,395) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.76% असून गेल्या 46  दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10%.असून गेले सलग 87 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आणि गेले 122  दिवस 3% पेक्षा कमी राहिला आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 16 कोटी 93 लाखांपेक्षा अधिक मात्रा शिल्लक

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात,केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित  75% लस खरेदी करून या लसीचा राज्ये  व केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य ) पुरवठा करत आहे. 

आतापर्यंत भारत सरकारने राज्य/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 149.70  कोटींहून अधिक (1,49,70,76,985)  मात्रांचा (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे पुरवठा केला आहे.

कोविड प्रतिबंधक  लसीच्या 16.93  कोटी (16,93,09,031) पेक्षा जास्त मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असून लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.