भालगाव व वडाळा महादेव येथील पी.बी.बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ

मुंबई,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- शिवा ट्रस्टच्या नर्सिंग महाविद्यालयांत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पी.बी.बी.एसस्सी. या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी क्षमता वाढवण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील संस्थेची विद्यार्थी प्रवेश क्षमता ३० वरून ९० इतकी तर, भालगाव, जि.औरंगाबाद येथील संस्थेची विद्यार्थी क्षमता २० वरून ६० इतकी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने आदेशाद्वारे कळविले आहे.

शिवा ट्रस्टचे वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथील सुप्रियादीदी सुळे कॉलेज ऑफ नर्सिंग पी.बी.बी.एस्सी. तसेच या ट्रस्टचे भालगाव, जि.औरंगाबाद येथील औरंगाबाद कॉलेज ऑफ पी.बी.बी.एस्सी. नर्सिंग येथील पदवी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्याची शिफारस आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शासनास केली होती. यानुसार विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यात आली आहे.