मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

Image

मुंबई,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- राज्य शासनाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. अभिजात मराठीची महती या दिनदर्शिकेत मांडण्यात आली आहे.

Image

अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक हरी नरके  यांनी याकरिता बहुमोल मार्गदर्शन केले आहे. ही दिनदर्शिका डिजिटल रुपात उपलब्ध आहे.