वैजापूर शहरातील विविध विकास कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर

छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयासाठी आमदार निधीतून दीड कोटींचा निधी उपलब्ध करून देणार – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर,३० डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबध्द असून आमचे नेते स्व.आर.एम.वाणी साहेब यांच्या प्रभागात एक कोटींची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत तसेच याच भागातील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयासाठी आमदार निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आ. रमेश पाटील बोरणारे यांनी केले.
आ.रमेश पाटील बोरणारे व माजी नगराध्यक्ष साबेरखान यांनी गुरुवारी (ता.30) शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील श्री.स्वामी समर्थ मंदिरातील पारायण जागेचे नूतनीकरण ( 20लाख रुपये ), कुंभारवाडा परिसर विकास ( 20 लाख रुपये ), बन्सीलाल नगर परिसर विकास ( 20लाख रुपये ), संत तुकाराम सभागृह ( 20 लाख रुपये ) व कालिका मंदिर विकास ( 20 लाख रुपये ) या मंजूर झालेल्या विकास कामाच्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या भागातील नागरिकांशी सवांद साधला. त्याप्रसंगी आ.बोरणारे बोलत होते.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, नगरसेवक शैलेश चव्हाण, डॉ. निलेश भाटिया, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, माजी नगरसेवक बापू वाणी, रमेश पाटील हाडोळे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, प्रमोद कुलकर्णी, बापू सालुंके, युवासेनेचे आमेरअली, श्रीकांत साळुंके, अण्णासाहेब शेळके, उत्तमराव साळुंके, पोपटराव भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.