बनावट नोटा प्रकरण:पाचही आरोपींना ३ जानेवारीपर्यंत कोठडी

औरंगाबाद,२९ डिसेंबर /प्रतिनिधी:-

बनावट नोटा छापून त्‍या चलनात आणण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या रघुनाथ चैनदास ढवळपुरे (४९), दादाराव पोपटराव गावंडे (४२), अक्षय आण्‍णासाहेब पडुळ (२८, तिघे रा. गजानन नगर, औरंगाबाद), नितीन कल्याणराव चौधरी (२५, रा. मुकुंदवाडी गाव) आणि समरान ऊर्फ लक्की रशीद शेख (३०, रा. नेहरु नगर, जसवंतपुरा) या पाचही आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपींनी किती बनावट नोटा तयार केल्या व कोणास वितरीत केल्या आहेत. आरोपींनी नोटा छपाईसाठीचे प्रशिक्षण कोणी दिले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करायचा आहे. आरोपी समरान ऊर्फ लक्की विरोधात यापूर्वी अशाच प्रकारचा गुन्‍हा दाखल असून आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेली कार कोणाच्‍या नावे आहे याचा आणि आरोपी बनावट नोटा छपाई सारखा गुन्‍हा किती कालावधी पासून करतो आहे याचा तपास बाकी असल्याने त्‍याला पोलिस   कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील निती किर्तीकर यांनी न्‍यायालयाकडे केली. सुनावणीअंती प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी आरोपींना ३ जानेवारी २०२२ पर्यंत पोलिस   कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले.