औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे त्रिशतक 

औरंगाबाद, दि. 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 115 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 63, ग्रामीण भागातील 52 जणांचा समावेश आहे. आज एकूण 249 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 174, ग्रामीण भागातील 75 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 139 पुरूष, 110 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6513 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2972 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

घाटीत अकरा, खासगीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 3 जुलै रोजी जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील 55 वर्षीय स्त्री, नक्षत्रवाडीतील हिंदुस्तान आवास येथील 78 वर्षीय पुरुष, नारळीबाग येथील 78 वर्षीय स्त्री, शाही नगर, गारखेडा येथील 65 वर्षीय स्त्री, फुले नगर, उस्मानपुऱ्यातील 52 वर्षीय स्त्री, दालावाडी, पैठण गेट येथील 55 वर्षीय पुरुष, अजिंठा, सिल्लोड येथील 78 वर्षीय स्त्री, आलमगीर कॉलनीतील 52 वर्षीय स्त्री, 04 जुलै रोजी बजाज नगरातील 55 वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील परतूर येथील 50 वर्षीय स्त्री, उस्मानपुरा, एकनाथ नगर येथील 64 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 233 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 227 कोरोनाबाधित वास्तव्यास होते. तर शहरातील खासगी रुग्णालयात तीन जुलै रोजी नेहरू नगर येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा, अन्य एका खासगी रुग्णालयात रोशन गेट येथील 41 वर्षीय स्त्री आणि चार जुलै रोजी सातारा परिसरातील 37 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 227, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 71, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 300 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *