राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघ जाहीर

औरंगाबाद,२५ डिसेंबर /प्रतिनिधी:-सांगली येथे येथे होणाऱ्या ज्युनिअर राज्यस्तरीय मुलांच्या आणि मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघाची घोषणा औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली.
            विविध वजन गटात विजयी होऊन औरंगाबादच्या संघात निवडण्यात आलेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत- मुले: ४४-४६ वजन गट-संदेश वाघिरे, ४६-४८ वजन गट-प्रथम पाटील, ४८-५० वजन गट-कृष्णा पांडे, ५०-५२ वजन गट-मानस वाघ, ५२-५४ वजन गट-अथर्व कुंडे, ५४-५७ वजन गट-ऋषिकेश श्रीवास्तव , ५७-६० वजन गट-अंगत ठाकूर, ६०-६३ वजन गट-शिवराय गरुड, ६३-६६ वजन गट- शिवम पाटील, ६६-७० वजन गट-क्षितिज उधाण, ७०-७५ वजन गट-शुभम घुशींगे, ७५-८० वजन गट-आयुष्य मोरे, ८१+ वजन गट-गौरव म्हस्के. मुली: ४४-४६ वजन गट-साक्षी वाघिरे, ५०-५२ वजन गट-माही निकम, ६६-७० वजन गट- भूमी जाधव. टीम कोच-राहुल टाक आणि अजय जाधव.
          संघात निवडण्यात आलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आ.श्रीकांत जोशी, उपाध्यक्षा डॉ.केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे आणि कोषाध्यक्ष आरोह बर्वे यांनी शुभेच्छा दिल्या.