वैजापूर शहर व परिसरात येशू ख्रिस्त यांचा जन्म सोहळा उत्साहात साजरा

वैजापूर,२५ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहर व परिसरातील चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्म सोहळा शनिवारी विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील स्टेशन रोडवरील करुणा माता चर्च येथे प्रभू येशू यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त फादर संजय ब्राह्मणे यांनी प्रभू येशूंचा संदेश उपस्थिताना वाचून दाखवला. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी  उपस्थितांना जगाचे तारणहार प्रभू येशूच आहे असे प्रतिपादन करून त्यांच्या चरणी जगातून कोरोना घालविण्याची प्रार्थना केली. कोरोना जगातून जाओ  यासाठी मास्क वापरणे, लसीकरण करून घेणे, सुरक्षित अंतर ठेवणे , गर्दी टाळणे आदी सूचना केल्या. शहरातील दुर्गावाडी चर्च, निर्मला इन्स्टिट्यूट व खंडाळा येथील चर्च मध्येही प्रभू येशूंचा जन्म दिन (ख्रिसमस डे) विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात पार पडला, या प्रसंगी वर्धमान नागरी बँकेचे सहायक व्यवस्थावक सुधीर लालसरे, विजय पवार व प्रभू येशूचे भक्त उपस्थित होते