विधिमंडळ सदस्यांना दिलेल्या धमकीबाबत एसआयटीद्वारे चौकशी करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वंकष धोरण तयार करणार

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा

मुंबई,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना समाजमाध्यमाद्वारे आलेल्या धमकीच्या घटनेवर कारवाई करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात विधिमंडळ सदस्य अथवा सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन अशा घटनांना आळा बसण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनिल प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सॲपद्वारे धमकी आल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. विधानसभा सदस्यांना अनेकदा अशा धमक्या देण्यात येतात यावर कडक कारवाई होऊन भविष्यात अशा घटना घडू नये याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातील बंगलोर येथील जयसिंग राजपूत या आरोपीने धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य महत्त्वाचे असून, या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत  सहभाग घेतला.

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा

Image

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्याने अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज विधानभवन परिसरात अजबच प्रकार घडलाय. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या.

May be an image of 8 people, people sitting, people standing and text that says "ओबीसी असगा कसवणूक करणाऱ्या आघाडी चा निषेध द्या जेची देयके भरण्याचे वेऊन शेतकऱ्यांचे रणाऱ्या बनावर कंपन्यांना परीक्षापेपरचे आयत्यावेळी सवणूक करणाऱ्या स आघाडी निषेध कंपन्यांना परीक्षापेपरचे देऊन आयत्यावेळी फसवणूक करणाऱ्या त्रकास आघाडी निषेध! गस दुलेक्ष दर्लक्षकरणाऱ्या आयाडा चा निषेध भरती"

 दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.