सातारा परिसरात शासकीय रूग्णालय उभारा-आ.सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

औरंगाबाद,२३ डिसेंबर /प्रतिनिधी:- शहरातील सातारा, देवळाई, इटखेडा या विस्तारित वसाहतींची लोकसं‘या जवळपास दीड लाखापेक्षा जास्त असून या विस्तारित वसाहतींसाठी सातारा परिसरात नवीन शासकीय रूग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.23) विशेष उल्लेखाव्दारे विधान परिषदेत केली.

May be an image of 1 person and standing

          औरंगाबाद शहरातील सदरील परिसरातील लोकसं‘या वाढल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या भागाात राहणारे बहुतांशी कुटुंब हे सर्वसाधारण सिमित उत्पन्न असणारे असून त्यांना खासगी रूग्णालयात उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. तर या वसाहतींपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णाालय (घाटी), जिल्हा रूग्णालय जवळपास 7 ते 8 कि.मी. असल्याने याठिकाणी जाणे-येणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. सातारा गावात महानगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते फक्त साथरोग निवारण व लसीकरणापुरते मर्यादित आहे. या भागात मोठ्या रूग्णालयाची आवश्यकता असून तशी मागणी देखील या भागातील नागरिकांमधून होत आहे. सातारा परिसरात शासकीय जमीन देखील उपलब्ध असल्याने याठिकाणी शासकीय रूग्णालय उभारले जाऊ शकते. याठिकाणी रूग्णालय उभारले तर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी विशेष उल्लेखाव्दारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचा सभानुभूतीपूर्वक विचार करून सातारा परिसरात शासकीय रूग्णालय उभारावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी विशेष उल्लेखाव्दारे केली.