प्रत्येक विद्यार्थिनीने स्वरक्षणासाठी स्वयंपूर्ण होणे काळाची गरज -गीता बागवडे

इनरव्हील क्लब औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे यांची ‘स्वसंरक्षण’  संकल्पना 

औरंगाबाद,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- सेल्फ डिफेन्स… म्हणजेच स्वसंरक्षण..! जगातल्या वाईट घटकांपासून घाबरून न राहता त्यांना तोंड देणं, यासाठी प्रत्येक मुलीने कणखर होण्याची आवश्यकता आहे. यासाठी  इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे आणि त्यांच्या इनरव्हील क्लबच्या सदस्यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित महाविद्यालयातील मुली आणि शिक्षिका यांना दहा दिवसांचे स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात आले. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलिस निरीक्षक  गीता बागवाडे, दामिनी पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक  सुषमा पवार होत्या.
                      झाशीच्या राणीलाही वाईटाचा बिमोड करण्यासाठी लढावं लागलं आणि आताची स्त्रीसुद्धा दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी लढतेच आहे. झाशीच्या राणीच्या आणि आताच्या स्त्रीच्या समस्यांच स्वरूप बदललं आहे पण, या समस्यांविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेला कणखरपणा, स्वसंरक्षणाबरोबरच अबलांच्या संरक्षणासाठी हवी असलेली धमक यांची गरज आजच्या मुलीला पुन्हा भासू लागली आहे.  आजच्या चित्रपटांमध्ये दाखविल्या गेलेल्या प्रक्षोभक देखावे, जे समाज आणि महिला दोघांसाठीही धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहेत,  हे सर्व टाळण्यासाठी कोणत्याही महिलेला स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तयार करावे लागेल. वास्तविकता किंवा सर्वत्र कुटुंबे एकत्र राहू शकत नाहीत, म्हणून आजच्या युगात, महिलांनी स्वत: च्या सुरक्षेसाठी मिरपूड स्प्रे, कराटे यासारख्या गोष्टी शिकून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मजबूत असणे आवश्यक आहे. आजच्या विकसित आणि बदलत्या भारतामुळे महिला स्वत: चे संरक्षण करू शकतात, अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे, महिलांना स्वतःच्या सुरक्षेबद्दल तयार रहावे लागेल. महिला आणि मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या १००, ११२ या क्रमांकावर, दामिनी पथक किंवा महिला तक्रार निवारण कार्यालयाशी निसंकोच संपर्क करावा असे प्रतिपादन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी केले. 

Displaying SELF DEFENS 2.jpg


                                 टपोरी मुलांनी केलेली छेडछाड, भुरट्या चोरट्यांचा त्रास, अपहरण, कामाच्या किंवा शिक्षणाच्या ठिकाणचं लैंगिक शोषण यासारख्या गंभीर समस्या मुलींच्या आयुष्यात आ वासून उभ्या असतात. घर सोडून मुली शिक्षण-नोकरीसाठी बाहेर पडू लागल्याने भाऊ-वडील यांच्या कवचातूनही त्या बाहेर पडल्या आहेत. अशा वेळेस स्वत:चं संरक्षण करण्याची वेळ त्यांच्या स्वत:वर आलेली आहे. या संकटांनी खचून जाऊ नये, किमान प्राथमिक पातळीवर मुलींना स्वत:चं संरक्षण करता यायला हवं, या हेतूने इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे यांच्या ‘स्वसंरक्षण’ या संकल्पनेने आकार घेतल्याचं दामिनी पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सुषमा पवार यांनी मार्गदर्शन केले.                

यावेळी इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे, सेक्रेटरी छाया भोयर, माजी जिल्हाध्यक्ष उषा धामणे, रेखा केदारे, वृषाली उपाध्ये, आशा भांड, माधुरी अहिरराव, हिरा पेरे पाटील, मंगल चव्हाण, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. गणेश डोंगरे, डॉ. लता काळे, दामिनी पथकाच्या निर्मला अंभोरे, लता जाधव, आशा गायकवाड, मनीषा बनसोडे, गिरीजा आंधळे,मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि सदस्य उपस्थित होते. मेळाव्यानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.