दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर

मुंबई,२१ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार

15 मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)

16 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा 

19 मार्च – इंग्रजी 

21 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय वा तृतीय भाषा)

24 मार्च – गणित भाग – 1

26 मार्च – गणित भाग 2

28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 

1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1

4 एप्रिल ;  सामाजिक शास्त्र पेपर 2

बारावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक

4 मार्च – इंग्रजी

5 मार्च – हिंदी

7 मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ

8 मार्च – संस्कृत