सौभाग्यवतींसह मंत्री रावसाहेब दानवे यांचा बैलगाडीतून फेरफटका

औरंगाबाद,२० डिसेंबर /प्रतिनिधी:- केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या सौभाग्यवती निर्मला दानवे यांच्यासह बैलगाडीवरुन फेरफटका मारला. यावेळेस मिसेस दानवेंसोबत त्यांची नातही आहे. या बैलगाडीची रंगसंगतीही भाजपच्या ध्वजासह मिळतीजुळती आहे. दानवे यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूकवरुन बैलगाडीतून फेरफटका मारतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

पोस्टमध्ये काय म्हंटलंय?

जिवा शिवाची बैल जोड़…

लाविल पैजंला आपली कुडं….

आयुष्याच्या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी व त्याचबरोबर माझ्या नाती सोबत गावी असताना बैलगाडीवरून शिवारात फेरफटका मारला