पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गती वाढवा-मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद,२० डिसेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद शहराची तहान भागविणाऱ्या 1680 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेऊन आतापर्यंत 90 कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले असून कामाची वेग वाढविण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिल्या.

Displaying IMG_8176.JPG

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे नविन पाणी पुरवठा योजना ची आढावा बैठक आज सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकी पूर्वी सकाळी महानगर पालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नक्षत्रवाडी येथील एमबीआर, डब्ल्यू टी .पी. तसेच पाईप निर्मिती प्लांट ची पाहणी केली.

पाणीपुरवठा साठी लागणाऱ्या पाईपचे उत्पादन 15 जानेवारी 2022 पर्यंत सुरु करा अशा सूचना महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिल्या. यानंतर ईटखेडा येथील ई एस आर या उंच टाकीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजय शिरसाट, माजी  महापौर नंदकुमार घोडेले, शहर अभियंता एस डी पानझाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे आयोजित प बैठकीत 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, पाणीपुरवठा त्याच्या कामाला निधीची अडचण येणार नसून त्याची काळजी महापालिका प्रशासनाने घेतली आहे.महानगरपालिकेच्या वतीने या कामासाठी 17 कोटी आणि आज 75 कोटी असे एकूण 95 कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कामाची गती वाढवण्यात यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामाची प्रगती लक्षात यावी यासाठी बारचार्ट पालिका प्रशासनाला देण्यात यावा, जेणेकरून कामाचा आढावा घेणे सोपे जाईल. ई एस आर साठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ज्या काही जागा दिल्या आहेत त्यात काही अडचणी आल्यास त्या सोडविण्याच्या सूचना मनपा शहर अभियंता एस डी पानझडे व उपसंचालक नगररचना ए बी देशमुख यांना दिल्या असल्याचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

जायकवाडी येथे करण्यात येणार आहे. हेड वर्क (उपसा केंद्र) साठी लागणारी एन ओ सी पर्यावरण विभागाकडून तातडीने प्राप्त करण्याची सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांना दिल्या. पैठण ते औरंगाबाद दरम्यानअडीच हजार मी मी व्यासाची पाईप लाईन टाकण्यासाठी नॅशनल हायवे अथोरिटी(राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) ची परवानगी लवकरात लवकर घेण्याच्या सूचनाही मनपा प्रशासन अस्तिक कुमार पाण्डेय यांनी एमजेपी ला दिल्या. सातारा देवळाई येथे पाणी वितरण व्यवस्था करण्याची परवानगी देण्यात आली असून त्याचे अधिकार शहर अभियंता एच.डी पानझडे यांना देण्यात आले आहेत. विशेषतः गुंठेवारी भागात प्राधान्याने पाणीपुरवठा वितरण व्यवस्था राबवण्याच्या सूचना मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिल्या आहेत. नवीन वितरण व्यवस्था करत असताना अवैध नळकनेक्शन टाळण्यासाठी अवैधरित्या नवीन कनेक्शन देण्याच्या सूचना आहे चाली दिल्या. या बैठकीला मनपा शहर अभियंता एसडी पानझडे , नगररचना उपसंचालक ए बी देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किरण धांडे, पाणीपुरवठा प्रकल्प सल्लागार समीर जोशी, अभियंता हेमंत कोल्हे, फड आदी उपस्थित होते.