संत एकनाथ रंग मंदिराचे काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करा-प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय

काम दर्जेदार झाली नाही तर संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली तंबी

औरंगाबाद,२० डिसेंबर /प्रतिनिधी:- संत एकनाथ रंग मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून 31 डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करा, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज सोमवारी दिले .दरम्यान संत एकनाथ रंगमंदिराचे काम दर्जेदार झाले नाही तर संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली.

उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिराच्या अंतिम टप्प्यात आलेल्या कामाची पाहणी आज सोमवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. यावेळी त्यांनी रंगमंदिरात बसवण्यात आलेल्या खुर्च्यांची बारकाईने पाहणी केली. तसेच खुर्चीत बसून त्या मजबूत असल्याची खात्री केली.यावेळी काही सूचना दिल्या. प्रशासकांनी वातानुकूलित तसेच मेकॅनिझम चे प्रत्यक्षिक बघितले त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिराच्या चहुबाजूने पाहणी करून काही सूचना केल्या, तसेच रंग मंदिरासमोर असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या मूर्ती समोरील गार्डन आणि लाॅन नवीन करण्याचे आदेश दिले तसेच परिसर स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले. कामात तोडजोड खपवून घेणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे कामात दर्जेदारपणा दिसून नाही तर ब्लॅक लिस्ट करण्यात येईल असे संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी सुनावले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पाच जानेवारी पर्यंत पूर्ण करा
क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करून सूचना दिल्या.

5 जानेवारी पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण करा असे आदेश यावेळी मनपा प्रशासकअस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी शहर अभियंता एसडी पानझडे, नगररचना उपसंचालक ए बी देशमुख आदी उपस्थित होते.