विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह

शाळा फुलांनी, फुग्यांनी व रांगोळीनी सजविण्यात आल्या

औरंगाबाद,२० डिसेंबर /प्रतिनिधी:- महानगरपालिका सी.बी.एस.सी.शाळा उस्मानपुरा व सी.बी.एस.सी.शाळा गारखेडा येथे शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा फुलांनी, फुग्यांनी व रांगोळीनी सजविण्यात आल्या होत्या.विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.उस्मानपुरा शाळेत मुलांना निळ्या रंगाचे फुगे व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.फुग्यांसोबत संगीताच्या तालावर नाचतच विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केला.या कार्यक्रम प्रसंगी सी.बी.एस.सी.शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे, दीपक पारधे, शुभांगी कदम,शमा काझी,वैशाली हारदे,हे उपस्थित होते.

याच प्रकारे सीबीएसई गारखेडा शाळा येथे मुलांसाठी लाल रंगाचा ड्रेसकोड ही थीम ठेवण्यात आली होती .सर्व मुले लाल रंगाच्या वेशात उत्साहात उपस्थित होते.सुरुवातीलाच कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी डॉ.संतोष टेंगले उपयुक्त यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाप्रसंगी सर्व मुलांना फुगे व चॉकलेट देऊन शिक्षणाधिकारी श्री.रामनाथ थोरे,व समग्र शिक्षा अभियानचे प्रमुख ज्ञानदेव सांगळे,संजीव सोनार सांस्कृतिक अधिकारी यांनी स्वागत केले.अतिशय उत्साहात संगीताच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी मान्यवरांसोबत डान्स करत आनंद व्यक्त केला.

अतिशय उत्साहात शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीबीएससी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे ,सहशिक्षक अमोल शेरखाने, अल्ताफ अहमद व अस्मिता अंभोरे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाप्रसंगी मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी व शिक्षक उपस्थित होते.