आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते इटखेडामध्ये जलकुंभाचे भूमिपूजन

वैजापूर,२० डिसेंबर /प्रतिनिधी :- आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते आज इटखेडा परिसरमध्ये जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच नक्षत्रावाडी या भागामध्ये चालू असलेल्या पाण्याचा पाईप लाईनच्या कामाची पाहणी केली. आणि इटखेडा येथील हमीदिया पार्क, वैतागवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन देखील आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले.

Displaying IMG_8107.JPG

याप्रसंगी आमदार शिरसाट म्हणाले की, या आधी सातारा-देवळाई या भागात देखील जलकुंभाचे भूमिपूजन केले असून आणि ते जलकुंभाचे काम देखील सुरू आहे, आणि आता या इटखेडा परिसरात देखील भूमिपूजन झाले, या भागातील प्रत्येक नागरिक हा माझा हक्काचा असून त्याला पाण्यासाठी नेहमी भटकंती करावी लागते, पण आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 1680 कोटींची आपल्या शहरासाठी पाणी योजना मंजूर केली आहे, आणि या पाणी योजनेचे काम देखील सुरू आहे, आणि लवकरच काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी उपलब्ध होईल, माझ्या पश्चिम मतदार संघात पाण्याची पाईप लाईन काम पूर्ण झाले तरच मला प्रत्येक कॉलनीमध्ये रस्तयाचे काम पूर्ण करता येईल जेणे करून नागरिकांना याचा त्रास होणार नाही असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी केले.

यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, एमजीपीचे अजय सिंह , माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापोर राजेंद्र जांजल, सखाराम पानझडे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख सतीश निकम, राजू राजपूत, सुनील खडके,गौतम सोनवणे, ईश्वर जगदाळे, महिला आघाडीच्या अनिता मंत्री, सारिका शर्मा, जयश्री इंदापुरे आदींची उपस्थिती होती.