ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत यांचा मुख्य फेरीत प्रवेश चैतन्य अरुणमणी, अवनीश चाफळे , दिया रमेश यांचा मुख्य फेरीत प्रवेश

Displaying avnesh Chafle.JPG
Avaneesh Chafle

औरंगाबाद,१९ डिसेंबर /प्रतिनिधी:- ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत  अवनीश चाफळेने दुस-या मानांकीत शशांक कर्नाटकीचा 6-7(6), 6-0, 6-0 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.      
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत चैतन्य अरुणमणीने  एम. दिगंथचा 6-1, 6-2 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकीत पार्थ मेहताने अर्जुन किर्तनेचा 4-6 7-5 6-3 असा तर पाचव्या मानांकीत शिवतेज शिरफुलेने  रेहान मलिकचा 6-4, 6-3 असा पराभव कर मुख्य फेरीत प्रवेश केला. 
मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत बिगर मानांकीत दिया रमेशने पाचव्या मानांकीत स्निग्धा रुहिलचा 6-4, 6-2 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकीत जया कपूरने सविता बभुवनेश्वरनचा 6-0, 6-2 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली. एंजल पटेलने लेखा चिरुवोलूचा 6-2, 6-3 असा तर हविशा चौधरीने मेहक कपूरचा 6-2, 6-4 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी- मुले

चैतन्य अरुणमणी (1) वि.वि एम. दिगंथ 6-1, 6-2

अवनीश चाफळे वि.वि शशांक कर्नाटकी (2) 6-7(6), 6-0, 6-0

अर्णव बनसोडे वि.वि ध्रुव सोनी 6-3, 6-4

पार्थ मेहता (4) वि.वि अर्जुन किर्तने 4-6 7-5 6-3

शिवतेज शिरफुले (5) वि.वि रेहान मलिक 6-4, 6-3

स्वराज ढमढेरे वि.वि पार्थ काळे 6-2, 6-2

आयुष पुजारी वि.वि सार्थक गायकवाड 6-1, 6-2

विश्वजीत सणस वि.वि नील केळकर 6-0, 6-2

मुली

दिया रमेश वि.वि स्निग्धा रुहिल (5) 6-4, 6-2

जया कपूर (4) वि.वि सविता बभुवनेश्वरन 6-0, 6-2

एंजल पटेल वि.वि लेखा चिरुवोलू 6-2, 6-3

हविशा चौधरी वि.वि मेहक कपूर 6-2, 6-4

दिशा बेहरा वि.वि  विष्मा थुरका 6-3, 6-0