लेन्सकार्ट कंपनीला ९३ लाखांना फसविले ,आरोपीला अटक

औरंगाबाद,१८ डिसेंबर /प्रतिनिधी:- लेन्‍सकार्ट कंपनीच्‍या स्‍टोअरमधून ग्राहकांनी खरेदी  केलेल्या सामानाचे पैसे कंपनीच्‍या खात्‍यावर जमा न करता क्यूआर काडेव्‍दारे आपल्या खात्‍यावर वळती करुन कंपनीला सुमारे ९३ लाख १४४ रुपयांचा चूना लावणाऱ्या  दोघांपैकी एकाला सायबर पोलिसांनी शुक्रवारी दि.१७ रात्री अटक केली. त्‍याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी शनिवारी दि.१८ दिले.  दामोधर वामन गवई (३५, रा. लक्ष्‍मी कॉलनी, मुळ रा. पेठ ता. चिखली जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.

Lenskart raises additional $220 million for global expansion

 

या  प्रकरणात शमिका ऑरगॉनिक इंडिया प्रा.लि. कंपनीचे संचालक शिरीषकुमार प्रतापराव पगारे (४६, रा. वसुंधरा कॉलनी, एन-७ सिडको) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीने कंपनीमार्फत लेन्‍सकार्ट सोल्युशन्‍स प्रा.लि. या गॉगल्‍स व चष्‍मे विक्री करणार्या कंपनीची औरंगाबाद, नाशिक  आणि ठाणे येथे फ्रेंचायसी घेतलेली आहे. ४ नोव्‍हेंबर २०१९ रोजी लेन्‍सकार्ट स्‍टोअरला मॅनेजर म्हणुन मयुर उत्तमराव देशमुख (२६, रा. स्‍वामीसमर्थ अपार्ट, सातारा परिसर) याची नियुक्ती करण्‍यात आली होती. तर दामोधर गवई याची सेल्समन नियुक्ती करण्‍यात आली होती. १० नोव्‍हेंबर रोजी लेन्‍सकार्ट कंपनीचे एरिया मॅनेजरने फोन करुन फिर्यादीला ग्राहकांना विक्री केलेल्या सामानाचेकार्ड पेमेंटची काही रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान फिर्यादी हे नोकरी निमीत्त ओमान मध्‍ये असल्याने त्‍यांनी भाऊ सुशिल पगारे याला प्रकरणाची चौकशी करण्‍याचे सांगितले. सुशिलने चौकशी केली असता, आरोपींनी ग्राहकांना कार्ड स्‍वाईप मशीन खराब झाल्याचे सांगत ग्राहकांनी खरेदी केलेल्या सामानाचे सुमारे ९३ लाख १४४ हजार रुपये मोबाइलवरील क्युआर कोडव्‍दारे आपल्या खात्‍यावर वळती केल्याचे समोर आले. दरम्यान घोटाळा उघड होण्‍यापूर्वी म्हणजे ९ नोव्‍हेंबर रोजी मयुर देशमुख याने आजोबा वारल्याचे कारणसांगत स्‍टोअर सोडून दिले होते.

याबाबत फिर्यादीने आरोपी मुयर देशमुख याच्‍याकडे चौकशी केली असता त्‍याने कबुली दिली. तसेच गुन्‍ह्यातील चोरलेल्या रक्कमेपैकी ९३ हजार रुपये फिर्यादीच्‍या खात्‍यावर जमा केले. प्रकरणात सायबर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करुन आरोपी दामोधर गवई याला आज न्‍यायालयात हजर केले असता, सहायक सराकरी वकील अर्चना लाटकर यांनी आरोपीने गुन्‍ह्यातील रक्कम कोणकोणत्‍या खात्‍यावर वळती केली. मुख्‍य आरोपी मयुर देशमुख याला अटक करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.