वैजापूर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी ; स्वामी परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन

Displaying IMG-20211218-WA0161.jpg

वैजापूर,१८ डिसेंबर /प्रतिनिधी :- येथील प.पू.दत्तगिरीजी महाराज आश्रमात संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ व श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त  पुरुष व बालगोपाल जपानुष्ठान, गुरुचरित्र पारायण सोहळा व दत्त जयंती उत्सव शनिवारी भांगशी माता गड चे श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या प्रवचनाने व भक्तांना महाप्रसाद प्रदान करून संपन्न झाला. माता-पितांनी आपल्या मुलांना संस्कार देण्याची गरज आहे असे उपदेश करून गुरुकुल आश्रमातील संस्कार हे आदर्श पुत्र व पुत्री घडण्यास सहाय्य करतात असे परमानंदगिरी महाराज आपल्या प्रवचनात म्हणाले.

सुरुवातीला बाबाजी भक्त संतोष ओंकार साळुंके यांनी महाराजांचे पूजन केले  प्रास्ताविक व सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंह राजपूत यांनी केले. प,पू,गुलाबगिरी महाराज,भोलगिरी महाराज,रामगिरी महाराज,शेषगिरी महाराज,उंडे महाराज,दत्तगिरीजी महाराज यांचे पूजन भक्त परिवाराने केले.याप्रसंगी आमदार प्रा,रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, नगराध्यक्षा  शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी नगरसेवक रमेश हाडोळे, भाऊलाल सोमासे, नगरसेवक शैलेश चव्हाण, प्रशांत कंगले, जयमाला वाघ, प्रशांत शिंदे,भीमाशंकर साखरे, अमोल बोरणारे, रामकीसन जोरे, बापू गावडे, सुनील मोटे, रामकृष्ण पुतळे, ज्ञानेश्वर बावचे, अरविंद साळुंके आदी उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यातआला.यावेळी बोलतांना आ.रमेश बोरनारे यांनी  आश्रमाला लागेल ती मदत देण्याचे जाहीर  केले.